करोनाचा फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ, घरांच्या विक्रीमध्ये झाली मोठी घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 22, 2020

करोनाचा फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ, घरांच्या विक्रीमध्ये झाली मोठी घसरण

https://ift.tt/3riiKww
वृत्तसंस्था, मुंबई : चालू वर्षामध्ये देशातील आघाडीच्या सात शहरांमधील केवळ १.३८ लाख घरांचीच विक्री झाली आहे. गेल्या वर्षी (२०१९) याच शहरांमधील २.६१ लाख घरांची विक्री झाली होती, अशी माहिती 'अॅनारॉक'द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या 'इयर एंड डेटा'मध्ये देण्यात आली आहे. 'अॅनारॉक'तर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षी घरांच्या विक्रीमध्ये जवळपास ४७ टक्क्यांची घसरण झाली आहे. 'अॅनारॉक'च्या अहवालानुसार नवीन घरांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४६ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी २.३७ लाख नवी घरे बांधण्यात आली होती. यंदा मात्र, १.२८ लाख नव्या घरांची निर्मिती करण्यात आली. अहवालात नमूद केल्यानुसार रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चालू वर्ष अनेक चढउतारांचे ठरले. असे असले, तरी चौथ्या तिमाहीमध्ये या क्षेत्राला 'अच्छे दिन' येण्याची आणि मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विविध ऑफर आणि सवलतींमुळे देशातील आघाडीच्या सात शहरांमध्ये घरांची विक्री चांगली झाली आहे. नवीन घरांमध्ये २ टक्के वाढआघाडीच्या सात शहरांमध्ये २०१९च्या चौथ्या तिमाहीतील ५१,८५० घरांच्या तुलनेत २०२०च्या चौथ्या तिमाहीत ५२,८२० घरांची भर पडली. वार्षिक आधारावर घरांच्या संख्येत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. हैदराबादने अन्य शहरांना मागे टाकले असून, चालू तिमाहीत १२,८३० नव्या घरांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ११,९१० घरांसह मुंबईने दुसरे स्थान पटकावले आहे. शहरांमधील नव्या घरांच्या संख्येत वाढ झाल्याने न विकलेल्या घरांच्या संख्येत वार्षिक आधारावर २ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.