दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वामी खंडणीच्या गुन्ह्यात पुन्हा अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 25, 2020

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वामी खंडणीच्या गुन्ह्यात पुन्हा अटक

https://ift.tt/3aD8xF7
नगर: दरोड्याचा गुन्ह्यात बंगल्याचा दरवाजा तोडून अटक करण्यात आलेला आरोपी बुधवारी जामिनावर सुटला. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी भिंगार पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. ठाण्यामध्ये लॉरेन्स स्वामी याच्याविरोधात मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात स्वामीला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्वामी याला दरोड्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. भिंगारमध्ये २३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी पुरणचंद जोशी हे आपल्या गाडीतून जाताना त्यांना लॉरेन्स स्वामीने आपल्याकडील कार आडवी लावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात स्वामी विरोधात खंडणी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी याला अटक करण्यात आली आहे.