नर्सने सहकारी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला; बॉयफ्रेंडला पाठवला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

नर्सने सहकारी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला; बॉयफ्रेंडला पाठवला

https://ift.tt/34tS42g
बंगळुरू: बेंगळुरूतील एका रुग्णालयातील नर्सने आपल्या सहकारी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या नर्सला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नर्सचा प्रियकर प्रभू हा शेफ आहे. त्याने अशा प्रकारचा व्हिडिओ काढून तो मोबाइलवर पाठव, असं तिला सांगितलं होतं. विकृत प्रवृत्तीच्या प्रभूच्या सांगण्यावरून या नर्सने गुपचूप आपल्या सहकारी महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला आणि त्याला पाठवला. बाथरूमच्या खिडकीत मोबाइल असल्याचे एका अन्य कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित नर्सने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ती उपचारानंतर पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या नर्सची आधीच दोन लग्ने झाली आहेत, काही कारणास्तव तिची नाती संपुष्टात आली आहेत, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. चुकीच्या क्रमांकावरून तिला फोन आला होता. त्यावरून प्रभूची तिच्यासोबत ओळख झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तिची आधीच दोन लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्याने तिच्यापासून दूर राहायचे ठरवले. मात्र, नाते टिकवण्यासाठी तो सांगेल तसे ती करू लागली, अशी माहितीही उघड झाली आहे.