
जयपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री () यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद (Bharat Band) आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने पलटवार केला आहे. () आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाइम राजकारण करतात आणि त्यांना, तसेच अशोक गहलोत (Ashok gehlot) यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, अशा शब्दात राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ८ तारखेला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केले आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचे वक्तव्य गहलोत यांनी केले आहे. मात्र हे त्यांचे वक्तव्य निराधार आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाइम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही.' राजस्थानात शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरेच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी, असेही पूनिया यांनी म्हटले आहे. राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तरही अशोक गहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे, असेही पूनिया पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या पूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक वक्तव्य केले होते. आम्ही शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या भारत बंदचे समर्थन करत आहोत असे गहलोत यांनी म्हटले होते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-