'जिओ'च्या जाहिरातीत पंतप्रधान मोदी, सिद्धूंनी करून दिली आठवण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 17, 2020

'जिओ'च्या जाहिरातीत पंतप्रधान मोदी, सिद्धूंनी करून दिली आठवण

https://ift.tt/34niy5c
नवी दिल्ली : केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा २२ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बुधवारी काँग्रेस नेते यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'कॉर्पोरेटधार्जिणं सरकार' म्हणत टीका केलीय. 'जो कुणी यांना विरोध करेल त्याला देशद्रोही म्हटलं जातं. ही भारताच्या संविधानाची लढाई आहे. हे जाती-धर्माच्या नावावर या देशाला विभाजन करू इच्छितात' असंही सिद्धू यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या एका भाषणाचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये, 'तुमचे सगळे फायदे केवळ धनाढ्यांसाठी आहेत. तुम्ही जेवढ्या सरकारी कंपन्या आहेत त्यांना संपवण्यात आलं. उदाहरण म्हणून घ्या... आजपर्यंत मी असा पंतप्रधान पाहिला नाही जो 'जिओ धन धना धन'सोबत जाहिरात करतोय... सरकारी कंपनी बीएसएनएलला वार्षिक आठ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय... आणि एका वर्षात ९०० कोटी रुपये कमावतंय' असं म्हणताना ते दिसत आहेत. वाचा : वाचा : ' या सरकारी कंपनीकडे एक लाख कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध होता. रिलायन्सनं ओएनजीसीकडून ११ हजार कोटींचं तेल चोरलं. शाह कमिटी बनली, सर्वोच्च न्यायालयानं रिलायन्सला ओएनजीसीचे ११ हजार कोटी परत करण्याचे आदेश दिले, आजपर्यंत ते पैसे परत मिळाले नाहीत' असंही सिद्धू यांनी म्हटलंय. 'शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपयांचं कर्ज केवळ सरकारनं माफ केलं. तुम्ही दावा केला की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार... दुप्पट झालं का? मोदी सरकारकडून गेल्या वर्षी धनाढ्यांना साडे तीन लाख कोटींचं कर्ज माफ करण्यात आलं. मनमोहन सिंह सरकारमध्ये दोन लाख कोटींचा एनपीए आज १७ लाख कोटींवर कसा पोहचला? रिलायन्सकडे ४६ हजार कोटींची थकबाकी, ज्यांच्या विमानांतून प्रवास करतात त्यांची थकबाकी १ लाख कोटी, एस्सार ३७ हजार कोटी थकबाकी आहे. मोदी सरकारकडून अंबानींना सिमेंट प्लान्ट स्थापन करण्यासाठी १२४० एकर जमीन ४० कोटींना देण्यात आली. सिमेंट प्लान्ट तर स्थापन झालाच नाही परंतु, रिलायन्सनं ही जमीन ४८०० कोटींना विकली' असं म्हणत मोदी सरकार कॉर्पोरेट आणि धनाढ्यांसाठी काम करत असल्याची टीका सिद्धू यांनी केलीय. खासगी विमान कंपन्यांनी आता सरकारी विमा कंपन्यांची जागा घेतलीय. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रीमियमच्या माध्यमातून लूट केली जातेय. पीक खराब झालं तर शेतकऱ्यांना परतावाही कमी किंमतीचा दिला जातो. यामुळे केवळ शेतकऱ्यांचीच लूट होत नाही तर सरकारी खजानाही लूट सुरू आहे, अशी टीकाही नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावरून केलीय. काँग्रेसचे नेते असलेले नवज्योत सिंह सिद्धू सोशल मीडियावर सक्रीय दिसत असले तरी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनापासून ते दूरच आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासोबत भोजन घेतल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांना लवकरच कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. वाचा : वाचा :