विधान परिषद निकाल: पुण्यात महाआघाडीला अपक्षाची टक्कर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 4, 2020

विधान परिषद निकाल: पुण्यात महाआघाडीला अपक्षाची टक्कर

https://ift.tt/3oq7ziW
पुणे: पुणे विभाग शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे आणि विद्यमान आमदार अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये चुरस आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार हे तिसर्‍या स्थानावर आहेत. : वाचा: या मतदारसंघात विजयासाठी २५ हजार ११४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. मात्र, कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळाली नाहीत. त्यामुळे सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्यात येत आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या २० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेरीअखेरीस जयंत आसगावकर () यांना १७ हजार ५१३, सावंत यांना ११ हजार ३५८ मते मिळाली आहेत. त्यामुळं आसगावकर हे सहा हजार १५५ मतांनी आघाडीवर गेले आहेत. जितेंद्र पवार यांना पाच हजार ९७५, तर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात यांना चार हजार ६८४ मते मिळू शकली आहेत. अजून १० फेऱ्या बाकी आहेत. वाचा: या मतदार संघासाठी ५२ हजार ९८७ मतदान झाले होते. त्यापैकी दोन हजार ७८४ मते ही बाद झाली आहेत. त्यामुळे ५० हजार २२६ मते ही वैध ठरली आहेत. वैध मतांच्या निम्मी मते आणि त्यामध्ये एक मत अधिक केल्यावर येणारी २५ हजार ११४ ही मतसंख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात आला आहे.