Manoj Jarange: मनोज जरांगे मराठा मोर्चासह मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? दिले मोठे संकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 13, 2026

Manoj Jarange: मनोज जरांगे मराठा मोर्चासह मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? दिले मोठे संकेत

Manoj Jarange: मनोज जरांगे मराठा मोर्चासह मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? दिले मोठे संकेत

आंतरवाली सराटीतून काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली. 15 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा कूच करेल. 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांची राहुटी ठोकल्या जाईल. जरांगे दुसर्‍यांदा आझाद मैदानावर येत आहे. तर तिसऱ्यांदा भगवं वादळ त्यांच्या नेतृत्वात मुंबईवर धडकणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. काल त्यांनी सरकारवर कोणतीही टीका केली नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे. आजपासून सरकारला तडजोड, मध्यस्थी आणि वाटाघाटीसाठी मोजून सहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे. नेमका हाच धाग पकडत त्यांनी सरकारला अजून एक संधी दिल्याचे मानले जात आहे.

सरकारला अजून मोठी संधी

मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. काल झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली येथून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली असे चार मुक्काम करत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा पोहचेल. काल मुंबईला जाण्याच्या घोषणेनंतर मुक्काम स्थळावरील सर्व समन्वयक कामाला लागले आहेत. मात्र मुंबईला पोहोचेपर्यंत सरकारला आणखी वेळ देणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितले आहे. सरकारसोबत यशस्वी वाटाघाटी झाल्यातरी जरांगे अभिवादन आणि आभारासाठी आझाद मैदान गाठणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रात्री वैद्यकीय पथकाकडून तपासणी

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. रात्री वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. 15 तारखेला जरांगे पाटील अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार तर 19 तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. दोन दिवसात सरकार काही तोडगा काढतं का याकडे लक्ष लागले आहे. प्रश्न सुटला तरी जरांगे पाटील मुंबईत सरकारचे आभार मानण्यासाठी जाणारच असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान रात्री उशिरा वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. तर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाऊन तास चर्चा केली.

पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली जरांगेंची भेट

जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर रात्री उशीरा अंबडच्या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांनी उपोषणस्थळी जाऊन पाऊन तास चर्चा केली. मुंबईच्या आंदोलनाबाबतीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सरकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आंदोलनाला गालबोट न लावण्याचे आणि शांततेत आंदोलनाचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.