नवी दिल्ली : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. जवळपास पाच दशकानंतर देशाचे पंतप्रधान एएमयूच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं हा एक उल्लेखनीय क्षण ठरलाय. 'एएमयूच्या भिंतींवर देशाचा इतिहास कोरलेला आहे. इथे शिक्षण घेणारी विद्यार्थी जगात देशाचं नाव उजागर करत आहेत' असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलंय. हास्य-विनोद आणि शेरोशायरीत हरवलेल्या अनेक विद्यार्थ्यांशी आपली परदेशात भेट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. - समाजात वैचारिक मतभेद आहेत, परंतु जेव्हा राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याची वेळ येते तेव्हा मतभेद बाजुला सारायला हवेत. हाच विचार आपले तरुण साथी पुढे नेतील तेव्हा कोणतीही असं उद्दीष्ट राहणार नाही जे आपण साध्य करू शकणार नाही. - गेल्या शतकात मतभेदांच्या नावावर बराच काळ वाया गेला आहे. आता वेळ गमावता कामा नये, प्रत्येकाला एका ध्येयासोबत आत्मनिर्भर भारत घडवायचाय - आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. जे शतक भारताचं शकत म्हणमून मानलं जातंय, त्या लक्ष्याकडे भारत कसा पुढे वाटचाल करतोय याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. यासाठी, भारताला आत्मनिर्भर कसं बनवावं, हेच आपल्या सर्वांचं एकनिष्ठ लक्ष्य हेच असायल हवं. - सरकारनं मेडिकल एज्युकेशनसंबंधी खूप काम केलंय. सहा वर्षांपूर्वी देशात केवळ ७ एम्स होते. आज देशात २२ एम्स आहेत. शिक्षण ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं, बरोबरीनं पोहोचावं, प्रत्येकाचं आयुष्य बदलावं, याच ध्येयासह आम्ही काम करत आहोत. - सरकार उच्च शिक्षणात नोंदणीची संख्या वाढविण्यासाठी तसंच जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वर्ष २०१४ मध्ये देशात १६ आयआयटी होते. आज देशात २३ आयआयटी आहेत. वर्ष २०१४ मध्ये देशात ९ आयआयआयटी (Indian Institute of Information Technology) होते. आज देशात २५ आयआयटी आहेत. वर्ष २०१४ मध्ये देशात १३ आयआयएम होत्या. आज देशात २० आयआयएम आहेत. - एक शक्तीशाली महिलेचा प्रत्येक निर्णयात तितकंच योगदान असतं जेवढं इतर कुणाचं... मग गोष्ट कुटुंबाला दिशा देण्याची असो किंवा देशाला... मी देशातील अन्य शैक्षणिक संस्थांनाही हेच सांगेन की जास्तीत जास्त मुलींना शिक्षणामध्ये सहभागी करून घ्या - नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात २१ व्या शतकातील भारतातील विद्यार्थ्यांच्या गरजांचा सर्वात जास्त विचार करण्यात आलाय. आपल्या देशातील तरुण 'नेशन फर्स्ट'च्या आवाहनासोबत देशाल पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत - पूर्वी मुस्लीम मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक होतं आता ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आलंय. पूर्वी लाखो मुस्लीम मुलींनी शौचालयाअभावी शाळा सोडली होती, आता मात्र परिस्थिती बदलतेय - देश आज अशा मार्गावर पुढे वाटचाल करतोय जिथे धर्मामुळे कुणाही मागे सुटणार नाही, सर्वांना पुढे वाटचालीसाठी समान संधी निर्माण होईल, सगळे जण आपली स्वप्न पूर्ण करू शकतील. 'सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास' हा मंत्र मूळ आधार आहे. देशाचा हेतू आणि धोरणांमध्ये हाच संकल्प दिसून येतो : मोदी - आज देशात या योजना तयार केल्या जात आहेत त्या कोणत्याही धार्मिक भेदभावाशिवाय प्रत्येक वर्गापर्यंत पोहचत आहेत. ४० कोटींहून अधिक गरीबांची बँक खाती भेदभाव न करता उघडली गेली. कोत्याही भेदभावाशिवाय दोन कोटींहून अधिक गरिबांना पक्की घरं देण्यात आली. कोणत्याही भेदभावाशिवाय आठ कोटींहून अधिक महिलांना गॅस मिळाला : मोदी - मला अनेक लोक म्हणतात की, एएमयू कॅम्पस स्वत:च एक शहर आहे. अनेक विभाग, डझनभर वसतिगृहे, हजारो शिक्षक-विद्यार्थी... यात एक मिनी इंडियाच दिसून येतोय. इथे एकीकडे उर्दू शिकवली जातो तर हिंदीही, अरबी शिकवली जाते तर संस्कृतीचं शिक्षणही दिलं जातं : मोदी - आज एएमयूचे विद्यार्थी भारतातील सर्वोत्तम स्थानांसहीत जगातील शेकडो देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. एएमयूचे सुशिक्षित लोक जगातील कोणत्याही भागात भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात : पंतप्रधान मोदी - कोरोना संकटकाळात एएमयूनं समाजाला ज्यापद्धतीनं मदत केली ती अभूतपूर्व आहे. नागरिकांना नि: शुल्क चाचणी मिळवून देणं, आयसोलेशन वॉर्ड तयार करणं, प्लाझ्मा बँक तयार करणं आणि पीएम केअर फंडात मोठं योगदान देणं हे समाजाप्रती आपल्या जबाबदारी पूर्ण करण्याचं गांभीर्य दर्शवतं : पंतप्रधान मोदी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एक टपाल तिकीटही जारी केलंय. एएमयूच्या कुलगुरूंकडून पंतप्रधान मोदींना विद्यापीठाच्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.