माधुरी दीक्षितचं वेबवर पदार्पण; दिसणार सुपरस्टार 'अभिनेत्री'च्या भूमिकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

माधुरी दीक्षितचं वेबवर पदार्पण; दिसणार सुपरस्टार 'अभिनेत्री'च्या भूमिकेत

https://ift.tt/3roUMjp
मुंबई टाइम्स टीम धक धक गर्ल लवकरच ''च्या भूमिकेत दिसणार आहे, हे वाचून गोंधळलात ना? होय, नेटफ्लिक्सवरील आगामी वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती करण जोहर करत असून 'द अॅक्ट्रेस' असं याचं नाव असल्याचं कळतंय. याद्वारे माधुरी वेबविश्वात पदार्पण करतेय. या सीरिजचं दिग्दर्शन श्री राव करणार आहेत. गेल्या वर्षी माधुरी ‘कलंक’ या सिनेमात दिसली होती. हा भव्यदिव्य सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे यावेळी माधुरीने आपली भूमिका आणि वेब सीरिज निवडताना विशेष दक्षता घेतल्याचं म्हटलं जात आहे. ही सीरिज एक सस्पेन्स ड्रामा असून एका सुपरस्टारच्या आयुष्याभवती फिरणारी कथा पाहायला मिळणार आहे. वेब सीरिजच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्युल नुकतंच नाशिकमध्ये पूर्ण झालं असून. येत्या महिन्यात मुंबईत चित्रीकरणाच्या दुसऱ्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतंय. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हंड्रेड' या सीरिजमधील मकरंद यांची हट के भूमिका चांगलीच गाजली होती. आता माधुरी-मकरंदच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल अशी आशा आहे.