चिंताजनक! अमेरिकेत करोनाचे थैमान; ३३ सेंकदाला एकाचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

चिंताजनक! अमेरिकेत करोनाचे थैमान; ३३ सेंकदाला एकाचा मृत्यू

https://ift.tt/3rmbFuO
वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या एक कोटी ६० लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांची संख्याही तीन लाखांहून अधिक झाली आहे. २० डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात अमेरिकेत करोनामुळे दर ३३ सेकंदाला एकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या सात दिवसांत अमेरिकेत १८ हजारजणांना आपले प्राण गमवावे लागले. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील आठवड्यातील मृतांची संख्या ही आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. मागील आठवड्यात अमेरिकेत करोनाच्या नवीन प्रकरणात एक टक्क्यांनी घट झाली आहे. कॅलिफोर्निया, रोड आयर्लंड आणि टेनेसी या भागात सर्वाधिक करोनबाधित आढळले. तर, आयोवा, साउथ डकोटा आणि रोड आयर्लंड याभागात सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली. अमेरिकेतील ५० पैकी ३१ राज्यांमध्ये संसर्गाचा दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे. आयोवा आणि आयडेहो सारख्या भागात हा दर ४० टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ५ टक्क्यांहून अधिक संसर्ग दर असल्यास चिंतेची बाब आहे. https://ift.tt/3nKaFPc अमेरिकेत करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून लोकांनाही आवाहन केले जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना सुट्टीच्या दिवशी प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अमेरिकेच्या विमानतळांवर गर्दी दिसून आली. या तीन दिवसांत ३२ लाख प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकांनी सुट्टी साजरी करण्यासाठी प्रवास टाळला पाहिजे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, वेगाने बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. वाचा: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत पुढील महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जात आहे. अमेरिकेत सध्या फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाची लस दिली जात आहे.