धक्कादायक! पुण्यात पर्वती टेकडीवर तरुणीवर बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

धक्कादायक! पुण्यात पर्वती टेकडीवर तरुणीवर बलात्कार

https://ift.tt/3aCw3lK
म. टा. प्रतिनिधी, : पर्वती टेकडीवर तरुणीला भेटण्यासाठी बोलवून तरुणाने तिच्यावर केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतरही आरोपीकडून तरुणीला त्रास दिला जात असल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली. योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती टेकडीच्या जंगलात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी मॉलमध्ये, तर आरोपी हा एका कंपनीत काम करतो. मॉल आणि कंपनी शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली. आरोपीने २४ नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतरदेखील आरोपी तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.