वर्ध्यातील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; धक्कादायक माहिती झाली उघड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 18, 2020

वर्ध्यातील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; धक्कादायक माहिती झाली उघड

https://ift.tt/3ajNKpW
: शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मुथूट फिनकॉर्प फायनान्सच्या कार्यालयावर सशस्त्र पडल्याची घटना गुरुवारी, सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली होती. या दरोड्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. शाखा व्यवस्थापक या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. वर्ध्यात दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. दरोडेखोराने महिला कर्मचाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावून, तसेच चाकूचा धाक दाखवून साडेतीन किलो सोने आणि ३ लाख रुपयांची रोख असा एकूण अंदाजे ६६ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, पोलिसांनी आरोपींकडून ९ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, ठाणेदार धनाजी जळक यांनी या घटनेचा तपास केला. काल कंपनीच्या कार्यालयावर घातलेल्या दरोड्यात शाखा व्यवस्थापकाचाच हात असल्याचे समोर आले आहे. चार आरोपींना पोलिसांनी यवतमाळ येथून ताब्यात घेतले असून, त्यात शाखा व्यवस्थापकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन चारचाकी वाहने, तसेच सोने जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेबाबत पोलीस अधीक्षक आज, शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, त्याबाबत अधिक माहिती देणार आहेत.