ऑफिसला घेऊन जा मखान्यापासून बनवलेले ‘हे’ चविष्ट स्नॅक्स, जाणून घ्या सोपी रेसिपी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 31, 2025

ऑफिसला घेऊन जा मखान्यापासून बनवलेले ‘हे’ चविष्ट स्नॅक्स, जाणून घ्या सोपी रेसिपी

ऑफिसला घेऊन जा मखान्यापासून बनवलेले ‘हे’ चविष्ट स्नॅक्स, जाणून घ्या सोपी रेसिपी

मखान्याचे सेवन आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी एका खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यात असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. अशातच लोकं मखाना त्यांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करतात. काही लोकं सकाळी किंवा रात्री दूधासोबत मखाना खातात. तसेच काही लोकं भाजलेले मखाना खातात. तर आरोग्यासाठी फायदेशीर असलेले मखाने वजन कमी करण्यास मदत करते.

मखान्यामध्ये कॅल्शियम, मॅलिसियम, लोह आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात. तसेच यांच्या सेवनाने आपली हाडे मजबूत करण्यास, पचन सुधारण्यास, वजन नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही मखान्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवून नाश्त्यात त्यांचा समावेश करून शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी मखान्यापासून झटपट स्नॅक्स बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.

मखाना नमकीन

मखाना नमकीन बनवण्यासाठी, प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कॉर्न फ्लेक्स, बदाम, काजू आणि मखाना टाकून भाजून घ्या. त्यानंतर, मीठ, धणे पावडर आणि पिठीसाखर घालून मिक्स करा. स्वादिष्ट मखाना नमकीन तयार आहे, जे तुम्ही सहज बनवू शकता आणि ते स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय असेल.

मेक्सिकन मखाना

तुम्ही मेक्सिकन मखाना घरच्या घरी अगदी सहज पद्धतीने बनवू शकता. एका पॅनमध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करा. 2 कप मखाना टाका आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता त्यात टाको मसाला, लाल तिखट, मीठ आणि टाको सॉस मिसळा. 2 ते 3 मिनिटे मिक्स करा. आता त्यात कांदा, टोमॅटो, भाजलेले कॉर्न, जलापेनो आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार हा मेक्सिकन मखाना खूप चविष्ट लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bowled Over (@bowledoverbykari)

पाणी पुरी मखाना

तुम्ही पाणीपुरी मखाना बनवू शकता. यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर टाका. आता मखाना टाकून ते परतून घ्या. पुन्हा बटर टाका आणि आता त्यात पुदिना पावडर टाका आणि मिक्स करा. त्यानंतर पाणीपुरी मसाला टाका आणि चांगले मिक्स करा. पाणीपुरी मखाना तयार आहे.

मसालेदार रोस्टेड मखाना

मसालेदार रोस्टेड मखाना बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम करा. आता मीठ, हळद, मसाला आणि काळी मिरी पावडर टाका आणि मिक्स करा. आता त्यात मखाना घाला आणि गॅस मंद आचेवर ठेवून चांगले मिक्स करा. अशा प्रकारे तुम्ही मसालेदार मखाना स्नॅक्स बनवू शकता.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)