मुंबईः मुख्यमंत्री आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. कांजूरमार्ग येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडला हायकोर्टाकडून स्थगिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं आजच्या भाषणात मुख्यमंत्री याविषयी काही बोलणार का? हे महत्त्वाचं ठरणार आहे. नाताळ आणि नववर्षाला अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेला काय आवाहन करणार हे पाहणंही महत्त्वाच ठरणार आहे. तसंच, नववर्षांच्या मुहूर्तावर लोकल ट्रेन पुन्हा सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. तर, याबाबत आजच्या भाषणात मुख्यमंत्री काही बोलणार का याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. >> कांजूरमार्गच्या जागेचा वाद केंद्रानं आणि राज्यानं चर्चेतून सोडवला पाहिजेः मुख्यमंत्री ठाकरे >> आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतंः मुख्यमंत्री >> केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशालाः मुख्यमंत्री >> महाराष्ट्रासाठी, मुंबईकरांसाठी मी अहंकारी आहे; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला >> विकास कामांच्या आड नाही; कामाची प्रगती बघतोयः मुख्यमंत्री ठाकरे >> केंद्राकडून पैसे येण्याचे बाकी असताना आपण आत्मविश्वासानं पुढ जात आहोतः मुख्यमंत्री ठाकरे >> सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत, पण राजकीय हल्ले परतवत सरकारने एक वर्ष पूर्ण केलंः मुख्यमंत्री ठाकरे >> नवीन वर्षाच स्वागत करताना सावध राहा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन >> सार्वजनिक ठिकाणी मास्क वारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन >> नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता वाटत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे >> पुढील सहा महिने मास्क लावणं अनिवार्य आहे >> लस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत मास्क लावणं बंधनकार आहे >> प्रत्येक पावलावर सावध राहा, असं सांगण कुटुंबप्रमुख माझं कर्तव्य >> करोनावर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश आलं आहे: मुख्यमंत्री ठाकरे