पतीसोबत काश्मिरमध्ये गेली सना खान, शेअर रकेले खूप सारे फोटो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 7, 2020

पतीसोबत काश्मिरमध्ये गेली सना खान, शेअर रकेले खूप सारे फोटो

https://ift.tt/3mSr5Ex
मुंंबई- मनोरंजन विश्वाला कायमचं अलविदा म्हणणाऱ्या सना खानने २० नोव्हेंबर रोजी गुजरातच्या मुफ्ती अनस सय्यद याच्याशी एका खासगी कार्यक्रमात लग्न केलं. त्यानंतर सनाने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. आता ती आपल्या पतीसह सुट्टीवर गेली आहे आणि तिने सोशल मीडियावर त्याबद्दल माहितीही दिली आहे. तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे. तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट याचा पुरावा आहेत. रविवारी तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. यात ती पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये सना म्हणते की काश्मीर खूप थंड आहे. यावरूनच हे जोडपं काश्मीरमध्ये सुट्टीवर गेल्याचं कळतं. एवढंच नाही तर विमानात जाताना आणि बसल्यावरही सना खान आणि मुफ्ती अनस सय्यद पोज देताना दिसत आहेत. याफोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'शौहर और बेगम चले..' सना खानचा पती मुफ्ती अनस सय्यद यानेही रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात हे जोडपं एकमेकांच्या हातात हातात घेऊन विमानात बसलेलं दिसत आहे. यापूर्वी सना खानने तिच्या मेंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यासोबतच तिने आपल्या पतीसाठी एक सुंदर मेसेजही लिहिला होता. सना खान सातत्याने तिचे आणि नवऱ्याचे फोटो- व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहतेही या फोटोंना जास्तीत जास्त लाइक करून व्हायरल करत असतात.