
नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा (Sonia Gandhi) या ९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. देशात कृषी कायद्यांच्या () विरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन () आणि विषाणूचे संकट () पाहता सोनिया गांधी यांनी या निर्णय घेतला आहे. ( will not celebrate her birthday on december 9) खरे तर, पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकरी गेल्या १२ दिवसांपासून दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना हे शेतकरी विरोध करत आहेत. हे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हे नवे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज शेतकऱ्यांचा 'भारत बंद' नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसोबत बुधवारी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहाव्या फेरीतील चर्चेपूर्वीच आज शेतकऱ्यांनी 'भारत बंद' पुकारला आहे. या दरम्यान ठिकठिकाणी निदर्शने झाल्यामुळे महामार्ग बंद पडण्याची शक्यता आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पोलिस प्रशासन अलर्टवर आहे. जवानांना देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- काय-काय होऊ शकते बंद ? दिल्लीहून इतर राज्यांमध्ये जाणारे मार्ग बंद होऊ शकतात. कॅब सेवा देखील बंद राहू शकते. आझादपूर मंडीसह दिल्लीतील बाजार देखील बंद राहू शकतात. भाज्यांचा पुरवठा बाधित होऊ शकतो. मात्र, देशातील विविध राज्यांमधील आणि दिल्लीतील बाजारा सुरू राहतील असे कॅट या व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे. गुडगावमध्ये पेट्रोलपंप बंद करण्याचा निर्णय संबंधित संघटनेने घेतला आहे. हरयाणाहून आग्रा-मथुरा आणि पंजाबकडे जाणारी बससेवा सध्या बंद राहील. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-