नो मराठी, नो अॅमेझॉन; मनसेचा निर्वाणीचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 8, 2020

नो मराठी, नो अॅमेझॉन; मनसेचा निर्वाणीचा इशारा

https://ift.tt/2K2pRrG
मुंबई: मोबाइल अॅपवर मराठी भाषेचा पर्याय देण्यास टाळाटाळ करणारी जगप्रसदि्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी नाही तर नाही, असा निर्वाणीचा इशारा मनसेनं दिला आहे. () अॅमेझॉन.इन या अॅपवरून ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. ग्राहकांच्या सुविधेसाठी या अॅपवर अनेक भाषांचा पर्याय आहे. केवळ मराठी भाषेला त्यात स्थान नव्हते. हे लक्षात आल्यानंतर मनसेचे अखिल चित्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अॅमेझॉनला ई मेल पाठवला होता व मराठी भाषेला अॅपमध्ये प्राधान्य देण्याची मागणी केली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजॉस यांच्या वतीनं कंपनीच्या जनसंपर्क विभागानं तात्काळ प्रतिसाद देत याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, पुढं काहीच झालं नाही. त्यामुळं आक्रमक झाली आहे. मनसेनं अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावत कंपनीला इशारा दिला आहे. ‘तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही,' अशी तंबी मनसेनं दिली आहे. बॅन अॅमेझॉन, नो मराठी, नो अॅमेझॉन... असंही पोस्टवर नमूद करण्यात आलं आहे. मनसेच्या या इशाऱ्याला अॅमेझॉन आता कसा प्रतिसाद देते हे पाहावं लागणार आहे.