दिल्ली दंगल आरोपी इशरत जहाँवर तुरुंगात हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 23, 2020

दिल्ली दंगल आरोपी इशरत जहाँवर तुरुंगात हल्ला

https://ift.tt/3rozFgU
नवी दिल्ली : आपल्यावर झाल्याचा दावा दिल्ली दंगलीतील एक आरोपी हिने केलाय. या प्रकरणात इशरतच्या वकिलांकडून न्यायालयात एक अर्जही दाखल करण्यात आलाय. इशरत जहाँ हिच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला तसंच तिला मारहाण करण्यात आल्याचं या अर्जात म्हटलं गेलंय. तिहार तुरुंगात झालेल्या कथित हल्ल्यादरम्यान इशरत जहाँ हिच्या डोक्यावर वार करण्यात आले तसंच तिचे कपडेही फाडण्यात आले. तुरुंगातील इतर महिला कैद्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा इशरतनं केलाय. तुरुंगात झालेल्या या हल्ल्यानंतर इशरत मानसिक तणावाखाली आहे. तसंच तुरुंगात राहणं तिच्यासाठी आणखीनच कठीण झाल्याचं न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटलं गेलंय. न्यायालयानं यावर तुरुंग अधिकाऱ्यांना बुधवारी स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत. तिहार तुरुंगाचे पोलीस महासंचालक संदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशरत जहाँ आणि इतर महिला कैद्यांमध्ये तुरुंगात भांडण झालं होतं. त्यानंतर पुढचा वाद टाळण्यासाठी इशरत जहाँ आणि संबंधित महिला कैद्यांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये हलवण्यात आलं आहे. दिल्ली दंगली प्रकरणी इशरत जहाँ हिच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्याखाली (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.