लालबाग सिलिंडर स्फोट: पिता-पुत्रावर गुन्हा, अटकेची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 9, 2020

लालबाग सिलिंडर स्फोट: पिता-पुत्रावर गुन्हा, अटकेची शक्यता

https://ift.tt/2VRsVcW
म. टा. खास प्रतिनिधी, लालबाग येथील साराभाई मेन्शन इमारतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्यांचा मुलगा यश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. साराभाई मेन्शनमधील मंगेश राणे यांच्या घरात रविवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. राणे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. व्यवसायासाठी लागणारे साहित्य, तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर त्यांनी या खोलीत ठेवले होते. खोलीतून गॅसगळती होत असल्याचे येथील रहिवाशांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. रविवारी सकाळी काही करण्याआधीच सिलिंडरचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचे नाहक बळी गेले. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मंगेश आणि यश यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी झाल्याने दोघेही रुग्णालयात उपचार घेत असल्याने, घरी सोडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.