शेतकरी आंदोलन LIVE: शेतकरी नेते आज घेणार मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 9, 2020

शेतकरी आंदोलन LIVE: शेतकरी नेते आज घेणार मोठा निर्णय

https://ift.tt/2W1cTNz
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेला संघर्ष दोन आठवड्यांनंतरही संपलेला नाही. काल उशिरा रात्रीपर्यंत शेतकरी नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली, मात्र ती यशस्वी होऊ शकली नाही. शेतकरी आज सिंघु बॉर्डरवर सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी बैठक घेत आहेत. यानंतर ते आपली पुढील रणनीती ठरवतील. पाहुया या आंदोलनाशी संबंधित अपडेट्स... Live अपडेट्स... >> आज शेतकरी आंदोलनाचा १४ वा दिवस, अमित शहांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच >> सरकारच्या या प्रस्तावावर आज शेतकरी संघटनांचे नेते सिंघु बॉर्डरवर बैठक घेऊन चर्चा करतील आणि आपला निर्णय सरकारला कळवतील >> अमित शहा यांच्यासोबतची बैठक निष्फळ झाल्यानंतर आता सरकार शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव पाठवणार आहे. >> सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. ही घोषणा शेतकरी नेते हनान मुल्ला यांनी रात्री उशिरा केली. >> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शेतकरी संघटनांच्या १३ नेत्यांमध्ये काल रात्री उशिरा बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.