शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला मध्य प्रदेशात सापडली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 20, 2020

शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला मध्य प्रदेशात सापडली

https://ift.tt/3p7Dpl5
इंदोर : तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून अचानक बेपत्ता झालेली एक महिला तिच्या मूळ शहरात अर्थात मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये आढळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ साली संबंधित ३८ वर्षीय महाराष्ट्रातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झाली होती. दर्शनानंतर बाहेर पडताना तिथून ती अचानक बेपत्ता झाली होती. यासंबंधात तिच्या पतीनं पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारही दाखल केली होती. याशिवाय त्यानं उच्च न्यायालयात बंदी प्रात्यक्षिकरण याचिकाही दाखल केली होती. बहिणीच्या घराजवळ आढळली महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांच्या एका टीमला या महिलेचा ठावठिकाणा लागलाय. ही महिला इंदूरमध्ये आपल्या बहिणीच्या घराजवळ आढळली आहे. मानसिक स्थिती बघडलेली महिलेचा मानसिक स्थिती योग्य नसून ती कोणतीही माहिती देण्यास ही महिला असमर्थ असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गेल्या तीन वर्षांपासून ती कुठे होती? इंदूरला ती कशी पोहचली? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर अद्याप कायम आहेत. प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.