चिंता वाढली! फक्त ब्रिटनच नव्हे तर 'या' देशातही नव्या करोनाचे रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 22, 2020

चिंता वाढली! फक्त ब्रिटनच नव्हे तर 'या' देशातही नव्या करोनाचे रुग्ण

https://ift.tt/2WD6KHO
लंडन: ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर इतर देशांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केली आहे. नव्या प्रकारचा करोनाचा विषाणू बाधित रुग्ण फक्त ब्रिटनमध्ये नसून इतर देशांमध्येही आहे. इटलीमध्ये एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता इतर देशांमध्ये ही या संसर्गाचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. नव्या प्रकारच्या करोना विषाणूमुळे जगभरातील देश सतर्क झाले असून उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. विषाणूचा हा नवा प्रकार आधीपासूनच आपल्या देशात असल्याची शंका काही देशांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनसह डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि इटलीमध्ये नव्या विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळले असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. मात्र, ब्रिटन वगळता नव्या विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या कमी आहे. मात्र, संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. इटलीतही एक बाधित आढळला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोना विषाणूच्या नव्या प्रकाराची बाधा झालेला हा इटलीतील पहिला रुग्ण काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधून परतला होता. सध्या या रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. वाचा: फ्रान्सने व्यक्त केली चिंता फ्रान्समध्ये ही करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूमुळे करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा नव्या प्रकारचा विषाणू आधीपासून एका देशातून दुसऱ्या देशात फैलावला असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा करोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून नव्या प्रकारच्या संसर्गाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले आहेत. इटलीत आढळलेला नव्या प्रकारचा करोनाबाधित रुग्ण काही दिवसांपूर्वी जोडीदारासह ब्रिटनला गेला होता. तेथून परतल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत त्याला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले.