राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची दिली सुपारी, 'असा' उघडकीस आला कट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 29, 2020

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची दिली सुपारी, 'असा' उघडकीस आला कट

https://ift.tt/3aQsVmo
म. टा. प्रतिनिधी, : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या गुंडाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुंडाने त्याच्या साथीदारांना संबंधित नगरसेवकाच्या घरी पाठवले होतं, पण त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुंड अनिल यशवंते, त्याचे साथीदार आणि सुपारी देणारा अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांच्या मुलाला एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांना वडिलांवर खुनी हल्ला करण्यासाठी काही मुले बाणेर परिसरात आली आहेत. त्याचे काम कारागृहात असलेला गुंड यशवंते याच्याकडे आहे. त्याला ही सुपारी देण्यात आली आहे, असे सांगितले. त्याचवेळी तक्रारदार यांच्या पत्नी घरासमोरील गेट लावत असताना समोरच एक कार उभी केलेली होती. त्यात दोघे जण बसलेले होते. तक्रारदार यांनी कोण हवं आहे, अशी विचारणा केली असता, त्यांनी घाईघाईने कार पाठीमागे घेत तेथून निघून गेले. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी तत्काळ चतुःश्रुंगी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.