निवडणुकीपूर्वी टीएमसीत खळबळ; ममतादीदींनी बोलावली तातडीची बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 18, 2020

निवडणुकीपूर्वी टीएमसीत खळबळ; ममतादीदींनी बोलावली तातडीची बैठक

https://ift.tt/3p2jYtR
कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या () बड्या नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात चिंतेचे वातावरण आहे. पक्षाच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री () यांनी आज शु्क्रवारी पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जी यांनी ही बैठक पक्षाचे मोठे नेके यांच्या नाट्यपूर्ण राजीनाम्यानंतर बोलावली आहे. अधिकारी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. मात्र ही तातडीची बैठक नसून, ती पक्षाच्या नियमित बैठकांचाच एक भाग असल्याचे तृणमूल काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. दर शुक्रवारी पक्षाच्या अध्यक्षा टीएमसी नेत्यांना भेटत असतात असेही सूत्रांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसमध्ये खळबळ पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्या पूर्वी पक्षात खळबळ माजली आहे. पक्षाच्या मोठ्यानेत्यांसह छोट्या नेत्यांनीही बंडखोरीचा मार्ग पत्करल्यामुळे पक्षा नेतृत्वाला चिंता सतावते आहे. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर एका तासाच्या आत ते एका पक्षाच्या खासदाराच्या घरी गेले, असे सांगितले जात आहे. अधिकारी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुनील मंडल यांच्या घरी शोकसभेत सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र या बैठकीला पक्षाच्या असंतुष्ट नेत्यांची मिनी-मिटिंग असल्याचे मानले जात आहे. अधिकारी यांच्या पूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि आसनसोलचे माजी महापौर जितेंद्र तिवारी यांनी देखील राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. क्लिक करा आणि वाचा बातमी- प्रदेश सरकारने राजकीय कारणांसाठी त्यांच्या शहराला केंद्राकडून मिळाणारा फंड अस्वीकृत केला होता आणि हा आसनसोलशी केलेला न्याय नव्हता असे तिवारी यांनी मंत्र्याला पत्र लिहून म्हटले होते. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-