
मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी () च्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेनं पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. शिवसेनेच्या या तत्परतेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केल्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ( on UPA President) शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तिथे जाण्याआधी 'न्यूज १८' या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना पवारांनी यूपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेवर आपले मत मांडले. 'मला यूपीएच्या अध्यक्षपदामध्ये रस नाही,' असं पवार यांनी स्पष्ट केलं. 'माझ्याकडं तितका वेळ नाही आणि माझी तशी कुठलीही इच्छा नाही. शिवाय, असा कुठला प्रस्तावही नाही,' असं त्यांनी सांगितलं. वाचा: पवार हे यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं शिवसेनेन याआधीच स्पष्ट केलं आहे. पक्षाचं मुखपत्र 'सामना'च्या शनिवारच्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेनेनं () पवारांच्या नेतृत्वाचं गुणगान केलं होतं. भाजपशी लढण्यासाठी यूपीएला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (Rahul Gandhi) संघर्ष करणारे नेते असले तरी त्यांना आवश्यक ती साथ मिळत नाही, असं नमूद करत, शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे पवारांच्या नावाकडं अंगुलीनिर्देश केला होता. वाचा: शिवसेनेच्या या भूमिकेवरही पवारांनी खुलासा केला. 'शिवसेनेची भूमिका हे त्या पक्षाचं मत आहे. आमच्या पक्षाची ती भूमिका नाही. इतरांनीही माझं नाव यात ओढू नये,' असं पवार म्हणाले. वाचा: