
मुंबई: राज्यात सरकारच्या स्थापनेनंतर भाजपच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे शिवसेना नेते खासदार आता ईडीच्या रडारवर आले आहेत. राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात काल ट्विटरवर एका गीताच्या ओळी टाकून प्रतिक्रिया दिल्यानंतर राऊत यांनी आज पुन्हा भाष्य केलं. ( to ) वाचा: ईडीच्या नोटीस प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी संजय राऊत यांनी आज दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद बोलावली आहे. तत्पूर्वी, आज सकाळीच वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकच याबाबत माहिती देत आहेत. कालपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी हाणला. ईडी प्रकरणावर दुपारी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलेन, असं ते म्हणाले. वाचा: विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच राज्यात ईडीच्या नोटिशीचं सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना ईडीनं आतापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. आता संजय राऊत यांच्या यांना नोटीस बजावल्याचं समजतं. त्यामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. राऊत यांनी काल एक ट्वीट टाकून या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा: