आदिवासींच्या तालावर थिरकले मुख्यमंत्री, व्हिडिओ व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

आदिवासींच्या तालावर थिरकले मुख्यमंत्री, व्हिडिओ व्हायरल

https://ift.tt/2WB1NiG
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सीहोरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ढोल वाजवताना आणि पारंपरिक आदिवासी तालावर थिरकताना दिसले. शिवराज सिंह चौहान सीहोर जिल्ह्यातील नसुरल्लागंज जिल्ह्याच्या भिलाईमध्ये काही आदिवासी कुटुंबांना वनाधिकार पट्यांच्या वितरणासाठी दाखल झाले होते. या कार्यक्रमात १२१६ लाभार्थींना वनाधिकार पट्ट्यांचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी गावात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत स्थानिक आदिवासींनी पारंपरिक पद्धतीनं केलं. मोकळ्या ढाकळ्या पद्धतीचा नाच हा आदिवासींच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग... त्यामुळे मंचावरही पारंपरिक ताला-सुराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्रीही आदिवासी कुटुंबांच्या आनंदात सहभागी झाले. सरकारनं जाहीर केल्यानुसार, वन भूमीवर २००६ च्या अगोदरपासून राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना वनाधिकार पट्यांचं वितरण करण्यात आलं. यामुळे, सीप नदी सिंचन प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीची जमीन बुडणार नाही, याची खात्री करण्यात आली. तसंच या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून पाईपाद्वारे या कुटुंबांच्या शेतात पाणी पोहचवण्याचंही कामही हाताळलं जाणार आहे. सीप नदी सिंचन योजनेसाठी तब्बल १७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. येत्या वर्षापर्यंत २४ गावांच्या २० हजार एकर जमिनीपर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा पुरवली जाणार आहे.