
मुंबई: पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नी यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राजकीय टीका-टिप्पणीला वेग आला आहे. या नोटिशीवरून सत्ताधारी व विरोधी पक्ष भाजपचे नेते आमनेसामने आले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ( on ED Notice to 's wife) वाचा: एका कार्यक्रमाच्या प्रसंगी 'एएनआय'शी बोलताना आदित्य यांनी ईडी प्रकरणावर भाष्य केले. 'राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करते आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले. ईडी प्रकरणावर कोण काय म्हणाले? 'ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भाजपचे लोकच माहिती देताहेत. कालपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल - संजय राऊत, शिवसेना खासदार 'तुमच्या कारवाईला घाबरतं कोण? महाराष्ट्रातील कोणीही नेता ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही. शरद पवारांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली होती. तिचं काय झालं? ती नोटीस मागे का घेतली गेली? - नवाब मलिक (अल्पसंख्याक मंत्री व प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस) वाचा: