
जम्मू : जम्मू-कश्मीरमध्ये आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद (DDC Election Result)निवडणुकीचा आज निकाल घोषित केला जाणार आहे. या मतगणनेत २८० डीडीसी जागांसाठी तब्बल २१७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. जनतेनं आपली मतं भाजपच्या पारड्यात टाकलेत की ''च्या हे आज स्पष्ट होईल. LIVE अपडेट सकाळी ८.०० वाजता : - मतगणनेला सकाळी ९.०० वाजता सुरुवात होणार आहे. केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये या निवडणुकीसाठी एकूण ५१.४२ टक्के मतदान झालं होतं. आज ३० लाखांहून अधिक मतांची गणना विभागीय केंद्रांवर केली जाईल. - राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुासर जिल्हा विकास परिषद (डीडीसी) च्या निवडणुकीचे निकाल ऑनलाईन पाहिले जाऊ शकतात. या २८० डीडीसी निवडणुकांच्या मतदानाचा कल, पक्ष आणि अंतिम निकाल http://ceojk.nic.in या वेबसाईटवर पाहिले जाऊ शकतात.