अशी दिली होती सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 24, 2021

अशी दिली होती सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली

https://ift.tt/3699pOB
मुंबई: अभिनेता यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या जोडीची चर्चा सुरू आहे. वर्ष २०१८मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडीनं प्रेमाची कबुली दिली होती. 'गुलाबजाम' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटापेक्षा जास्त सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली .सिद्धार्थ आणि अभिनेत्री यांनी आपल्या नात्याला दुजोरा देत त्यांच्या चाहत्यांना 'व्हॅलेंटाईन डे'चं गिफ्ट दिलं होतं. यांनी 'व्हॅलेंटाईन डे'चे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोत दोघंही खूप खूश दिसत होते. मितालीनं शेअर केलेल्या फोटोत तिनं 'येस,येस, येस #व्हॅलेंटाईन डे' असं कॅप्शन देत सिद्धार्थवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यापूर्वी काही दिवसांपूर्वी सिद्धार्थनं मितालीसोबतचा एक डबस्मॅश व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. तर दोघांनी मनगटावर एक सारखे टॅटू देखील काढले आहेत. या टॅटूमुळंच दोघांच्या अफेरची चर्चा सुरू झाली होती.