
नवी दिल्ली : देशात करोना झपाट्यानं खाली आलेला दिसतोय. ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल. दुसरीकडे, देशभरात करोना लसीकरण मोहिमही सुरू आहे. त्यामुळे जवळपास गेल्या वर्षभर असलेला देशावरचा ताण कमी झालेला दिसून येतोय. गेल्या काही दिवसांपासून नव्या करोना संक्रमितांचा दररोजचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. १.८४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी दाखल झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत (शनिवारी सकाळी ८.०० ते रविवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) १४,८४९ नवे करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोना संक्रमितांचा आकडा १.०६ कोटींवर पोहचलाय. तर गेल्या २४ तासांत करोना संक्रमणामुळे १५५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात करोना विषाणूमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या आता १ कोटी ५३ लाख ३३९ वर पोहचलीय. गेल्या २४ तासांच तब्बल १५,९४८ रुग्णांनी करोनावर मात केलीय. आत्तापर्यंत देशातील तब्बल १ कोटी ०३ लाख १६ हजार ७८६ रुग्णांनी करोनावर मात केल्याचं स्पष्ट होतंय. समाधानाची बाब म्हणजेच, सध्या दररोज नव्यानं आढळणाऱ्या करोना संक्रमित रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे आणि हीदेखील एक समाधानाची बाब आहे. देशात सध्या १.८४ लाख करोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा ९६.८३ टक्के आहे. अॅक्टिव्ह केसेस १.७३ टक्के आहेत तर देशाचा मृत्यू दर १.४३ टक्के आहे. १.८९ टक्के आहे. चाचण्यांची संख्या करोना चाचण्यांच्या संख्येवर नजर टाकली असता गेल्या २४ तासांत ७,८१,७५२ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत देशात तब्बल १९ कोटी १७ लाख ६६ हजार ८७१ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम सुरू आहे. २३ जानेवारीपर्यंत एकूण १५ लाख ८२ हजार २०१ जणांचं करोना लसीकरण पार पडलंय. २३ जानेवारी रोजी एकाच दिवशी १ लाख ९१ हजार ६०९ जणांना लस देण्यात आलीय.