वॉशिंग्टन: डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या संसर्गाचा थैमान वर्षभरानंतरही सुरू आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या १० कोटीहून अधिक झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसारस, करोनाच्या संसर्गामुळे २१ लाखजणांचा बळी गेला आहे. करोनाच्या संसर्गाशी संपूर्ण जग सामना करत असताना नव्या स्ट्रेनने जगाची चिंता वाढवली. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधितांच्या संख्येत वाढ झाली. काही देशांमध्ये करोनाची दुसरी, तिसरी लाट आल्याचे म्हटले जाते. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर भारत आहे. तर, मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत चार लाखंहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. वाचा: ब्रिटनमधील परिस्थिती आणखी भयावह झाली असून एक लाखांहून अधिकजणांचे बळी गेले आहेत. करोनावर नियंत्रण मिळवलेल्या चीनमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. जगभरात १० कोटींहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असली तरी दुसरीकडे ५ कोटी ५० लाखांहून अधिकजणांना करोनावर यशस्वी मात केली आहे. वाचा: मागील वर्षभरात करोनाच्या थैमानामुळे जगात बदल झाले आहे. रोखण्यासाठी जगभरात लॉकडाउन, संचार बंदी आणि प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. करोनाच्या थैमानामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. वाचा: लस वितरण योग्य आणि निष्पक्ष पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अनेक विकसित देशांनी आपल्या लोकसंख्येच्या क्षमतेपेक्षा अधिक लशींची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे विकसनशील, गरीब देशांना लस मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची भीती याआधीच व्यक्त करण्यात आली.