भयानक! सूनेने केली सासूची निर्घृण हत्या, डोळेही फोडले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 27, 2021

भयानक! सूनेने केली सासूची निर्घृण हत्या, डोळेही फोडले

https://ift.tt/2YoDqWh
पाटणा: बिहारमधील येथे धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात सूनेने आपल्या सासूची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तिचे डोळेही फोडले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, परसा बाजार परिसरातील सकरैचा गावात वृद्ध सासूची सूनेने रागाच्या भरात निर्घृण हत्या केली. धर्मशीला देवी असे मृत सासूचे नाव आहे. तर आरती देवी असे सूनेचे नाव आहे. केल्यानंतर सूनेने तिचे डोळे काढले. या घटनेनंतर भानावर आलेल्या सूनेने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. स्थानिकांच्या माहितीनुसार, घरात ही भयानक घटना घडत असताना, मृत वृद्धेचा पती मांझील हा घराबाहेर होता. या घटनेबाबत त्याला काहीही माहिती नव्हते. तर तिचा मोठा मुलगा हा सकरैचा पंचायत कार्यालयात उद्घाटन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. या घटनेची माहिती मिळताच, परसा बाजार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीत होरपळलेल्या सूनेला तात्काळ पाटणा येथील पीएमसीएच येथे उपचारासाठी नेले. तर सासूचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू आणि सूनेचे दररोज भांडण होत होते. दोघांच्या भांडणांमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. काल घरात कुणीही नव्हते. हीच संधी साधून सूनेने सासूवर चाकूने हल्ला केला. हत्या केल्यानंतर तिने सासूने डोळेही फोडले.