भयानक! मोबाइल लपवून ठेवला म्हणून मुलीने केली वडिलांची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 27, 2021

भयानक! मोबाइल लपवून ठेवला म्हणून मुलीने केली वडिलांची हत्या

https://ift.tt/3t3lJd1
बिलासपूर: येथील जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी मोबाइल फोन लपवून ठेवल्याने नाराज झालेल्या मुलीने वडिलांनी काठीने मारहाण करून केली. त्यानंतर आईच्या मदतीने मृतदेह पुरला. पोलिसांनी या प्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला अटक केली आहे. बिलासपूर जिल्ह्यातील कोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंचनपूर गावात मंगलूराम धनवार (वय ५८) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मुलगी दिव्या (वय २८) आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघींनाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्याने आपल्या वडिलांच्या मर्जीविरोधात लग्न केले होते. त्यामुळे वडील नाराज होते. याच महिन्याच्या २३ तारखेला दिव्या माहेरी आली होती. दुसऱ्या दिवशी दिव्याला तिचा मोबाइल फोन कुठेच सापडला नाही. तिने याबाबत वडिलांना विचारले. मात्र, वडिलांनी उत्तर देणे टाळले. मोबाइल फोन सापडला नाही. त्यामुळे दिव्याने वडिलांशी वाद घातला. त्यानंतर मीच तो फोन लपवून ठेवल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर रागाने दिव्याने वडिलांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर दगड मारला. यात मंगलूराम यांचा जागीच मृत्यू झाला. मंगलूराम यांच्या हत्येनंतर दिव्या आणि आईने त्यांचा मृतदेह अंगणात खड्डा खोदून पुरला आणि तेथून पसार झाल्या. घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर फरार मुलीचा आणि तिच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपींना अटक केली.