सागरिका घाटगेच्या वडिलांचं निधन, सोशल मीडियावर लिहिली भावुक पोस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 15, 2021

सागरिका घाटगेच्या वडिलांचं निधन, सोशल मीडियावर लिहिली भावुक पोस्ट

https://ift.tt/35HKQrW
मुंबई- अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. ९ जानेवारी रोजी सागरिकाच्या वडिलांचं निधन झालं. अभिनेत्रीने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. सागरिकाच्या वडिलांचं वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर सागरिकाने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली. यात तिने वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आणि वडिलांसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. सागरिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून वडिलांचे आई, भाऊ आणि पती झहीर खानसोबतचे फोटो शेअर केले. हे वेगवेगळे फोटो शेअर करताना सागरिकाने लिहिले की, 'तुम्ही आमच्यासोबत नाही यावर विश्वास बसत नाही. मला माहीत आहे की तुम्ही एका सुंदर जागी गेला आहात. एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरून येऊ शकत नाही. मला सशक्त करण्यासाठी तुमचे आभार. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे.' सागरिकाची ही पोस्टही तिच्या चाहत्यांना खूप भावुक करणारी आहे. तिचे चाहते या पोस्टवर सागरिकाला खंबीरपणे प्रसंगाला सामोरं जाण्यास सांगत आहेत. तर काही तिच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करत आहेत. सागरिकाच्या वडिलांनी ९ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या एक दिवसआधी ८ जानेवारीला सागरिकाचा वाढदिवस होता. सागरिकाला 'चक दे गर्ल' म्हणूनही ओळखलं जातं. शाहरुख खानच्या चक दे इंडिया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर सागरिकाने 'रश', 'इरादा' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. २०१७ मध्ये सागरिकाने माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केलं.