साताऱ्यात राजेंचा विजय, लोकसभेच्या निकालानंतर छत्रपती उदयनराजे भोसलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 5, 2024

साताऱ्यात राजेंचा विजय, लोकसभेच्या निकालानंतर छत्रपती उदयनराजे भोसलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

https://ift.tt/PtzwkB3
सातारा : सातारच्या जनतेने ज्या पद्धतीने मला निवडून दिलं, त्याबद्दल मी पूर्णपणे असमाधानी आहे. लोक केवळ पैसे घेतात आणि मत देतात. पैसे जर घेणार असतील, तर त्याला काय अर्थ आहे. माझं मताधिक्य हे मला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित होतं. ते अपेक्षित मला मदत मिळाली नाही. मी याबाबतीत सविस्तर एक- दोन दिवसात बोलेन, असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. उदयनराजे म्हणाले, माझ्या आयुष्यात जेवढा वेळ गेला, मी काय कमवले, असा एक विचार येतो. निवडणूक येतात जातात, हार जीत असते. पण मला एक कळत नाही की, लोकं कशाकडे बघून मते देतात. पैशाच पाहिजे असतील पैसे कमवू. भ्रष्टाचारी हवे असतील तर भ्रष्टाचार करावा काय. इतके निट वागूनही ही अशी कमी मताधिक्क्याची चिठुर पोचपावती मिळत असेल, तर काय करावे. मिळालेल्या मताधिक्याबाबत मी समाधानी नाही. २०१९ला झालेल्या पराभवाचा वाचपा काढला का? अशी विचारला केली असता, उदयनराजे म्हणाले, मी वचपा वगैरे कोणाचा काढत नाही. मला जे पटत नाही ते मी करत नाही. तीन महिन्यात कोणी राजीनामा देवू शकत नाही. परंतु, मी दिला. कारण मला जे पटत नाही ते मी करत नाही. अन्यथा आज परिस्थिती काय असते. पण ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांना सॅल्युट. माझ्या झालेल्या विजयाबाबत सविस्तर एक- दोन दिवसात बोलेन, असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सांगितले. सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उदयनराजे यांनी पाटणचे शंभूराज देसाई, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, महेश शिंदे, शिवेंद्रराजे भोसले यांची कृतज्ञता व्यक्त करत शेवटी आभारही मानले.