इंदूरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

इंदूरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, जिवंत जाळण्याचा प्रयत्न

https://ift.tt/2XYpP7W
: मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय. १८ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी केला. या नराधमांचं कृत्य इथेच थांबलं नाही तर त्यांनी पीडितेला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा प्रयत्न पीडितेनं हाणून पाडला. इंदूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण मुलगी कोचिंग क्लासवरून आपल्या घरी परतत होती. रात्री जवळपास ९.०० वाजता पाचही आरोपींनी तिला एकटीला घेरलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडित मुलीवर चाकूहल्लाही केला तसंच तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, पीडितेनं जिवाच्या आकांतानं आरडाओरड केल्यामुळे काही लोकांच्या लक्ष या भागाकडे गेलं आणि ते तिथं पोहचले. लोक आलेले पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या घटनेत एका आरोपीला अटक केलीय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंदूरच्या भागीरथपुरामध्ये रेल्वे ट्रॅकजवळ दोन मुलांनी अगोदर पीडितेसोबत जबरदस्ती केली. त्यानंतर आणखी तीन मुलांनी त्यांना साथ देत पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला शहराच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांकडून पीडितेचा तसंच इतरांचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.