'टीम इंडिया, फार जल्लोष करू नका; दोन आठवड्यांनी खरी कसोटी आहे' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

'टीम इंडिया, फार जल्लोष करू नका; दोन आठवड्यांनी खरी कसोटी आहे'

https://ift.tt/391eQ42
नवी दिल्ली: ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत ३ विकेटनी पराभव केला आणि चार सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. भारतीय संघाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. अशातच इंग्लंडा माजी कर्णधार ()ने भारतीय संघाला शुभेच्छा तर दिल्या आहेत त्याच बरोबर सावध देखील केले आहे. वाचा- कसोटी मालिकेसह भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. आता पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा पीटरसनने सोशल मीडियावरून हिंदीत एक ट्विट केले आहे. वाचा- भारताने या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करावा कारण अनेक अडचणी असताना त्यांनी हा विजय मिळवला आहे. पण खरी कसोटी इंग्लंडविरुद्ध काही आठवड्यात होणार आहे ज्यांना तुम्हाला घरच्या मैदानावर पराभूत करायचे आहे. त्यामुळे सावध रहा. दोन आठवड्यात अधिक जल्लोष करण्यापासून सावध रहा, असे पीटरसनने म्हटले आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया मोहीम फत्ते केल्यानंतर आता भारताची मुकाबला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका पाच फेब्रुवारीपासून चेन्नई सुरू होईल. दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारी पासून तर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर २४ तारखेपासून डे-नाइट कसोटी सामना होईल. याच मैदानावर ४ मार्चपासून अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि त्यानंतर २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. भारतीय संघाची घोषणा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे. तर नियमीत कर्णधार विराट कोहली आणि इशांत शर्मा देखील संघात परतले आहेत. असा आहे पहिल्या दोन कसोटीचा संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकरू, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल