राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी? 'ही' दोन नावं चर्चेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी? 'ही' दोन नावं चर्चेत

https://ift.tt/39N32BO
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्याचे मुख्य सचिव हे वयोमानानुसार येत्या २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुख्य सचिवपदासाठी आणि या दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये आतापासूनच रस्सीखेच सुरू आहे. गेल्या वर्षी करोनाकाळात आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले प्रवीण परदेशी राज्याच्या सेवेत परतण्याच्या तयारीत आहेत. ते ९ फेब्रुवारीला राज्य सेवेत येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्य सचिवपद खुणावत असल्याने परदेशी हे संयुक्त राष्ट्रांची सेवा बजावून ३० डिसेंबरला मुंबईतील परतल्याचे समजते. सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी हे दोघेही १९८५च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत. कुंटे सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. तर परदेशी नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दोघेही याच वर्षी नोव्हेंबर २०२१मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे दोघांपैकी कुणालाही मुख्य सचिवपदी संधी मिळाली, तरी त्यांना काम करण्यासाठी १० महिने मिळणार आहेत. संजय कुमार यांना मुदतवाढ? फेब्रुवारीअखेरपर्यंत नव्या मुख्य सचिवांच्या नावावर निर्णय न झाल्यास मुख्य सचिव संजय कुमार यांना तीन महिने मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर संजय कुमार यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते. त्यासाठी सनदी अधिकाऱ्यांमधील एका गटाने अजोय मेहता यांच्या माध्यमातून हालचाली सुरू केल्या असल्याचेही समजते.