सराफा बाजार वधारला ; सोने-चांदीची नव्या वर्षात तेजीने सुरुवात, - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 1, 2021

सराफा बाजार वधारला ; सोने-चांदीची नव्या वर्षात तेजीने सुरुवात,

https://ift.tt/3mY7aDu
मुंबई : नव्या वर्षाची सुरवात सोने आणि चांदीने तेजीने केली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५०२३९ रुपये (Gold Rate on MCX) असून त्यात ७५ रुपयांची वाढ झाली. देखील वधारला आहे. एक किलो चांदीचा भाव ६८२७५ रुपये असून त्यात १८० रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार गुरुवारी सराफा बाजारात सोने २३५ रुपयांनी महागले होते. दिल्लीत सोन्याचा भाव ४९६७५ रुपये झाला. त्यात २३५ रूपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये २७३ रुपयांची वाढ झाली आणि भाव ६७७१० रुपये झाला होता. जागतिक बाजारात मागील वर्षात सोने दरात सरासरी २५ टक्के वाढ झाली आहे. करोना संकट आणि लॉकडाउन या काळात सोने प्रचंड तेजीत होते. आज जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव १८८५.८० डॉलर प्रती औंस होता. त्यात ०.४२ टक्के वाढ झाली. तर मागील महिनाभरातील सोन्याची ही उच्चांकी पातळी होती. चांदीचा भाव प्रती औंस २६.४० डॉलर होता. डॉलर इंडेक्सवर दबाव आहे . अमेरिकेत नव्या करोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदार करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे डोळे लावून आहेत. करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. त्यातच नव्या करोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट उभं राहील आहे. त्यामुळे या अनिश्चित काळात सोने गुंतवणूकदारांना तारणार आहे, असे कमॉडिटी विश्लेषकांना वाटते. आगामी काळात सोन्याचा भाव ६५००० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८८६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५३३१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४७२६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१५६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९५८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२१७० रुपये आहे.