
वनप्लस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस कंपनीने त्यांचे नवीनतम नॉर्ड स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण वनप्लस कम्युनिटी सेल 2026 4 जूनपासून सुरू झालेला आहे. वनप्लसच्या या मर्यादित कालावधीच्या सेलदरम्यान कंपनीच्या उत्पादनांवर डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमधील ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
वनप्लस कम्युनिटी सेल 2026
कंपनीचे फ्लॅगशिप वनप्लस 15 आणि वनप्लस 15आर, तसेच वनप्लस 13 लाइनअप, उत्पादनांवर डील्स उपलब्ध आहेत. वनप्लस कम्युनिटी सेल वनप्लस इंडिया, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल्सवर सुरू आहे.
वनप्लस कम्युनिटी सेल ऑफर तपशील
वनप्लस 15 वर उपलब्ध असलेल्या डील्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी 3 हजार रूपयांची सूट देत आहे. सेल दरम्यान, फोनची किंमत 77 हजार 999 रूपयांवरून 74 हजार 999 रूपयांपर्यंत कमी होते. अशाच प्रकारच्या बँक ऑफर्स वनप्लस 15R वर देखील उपलब्ध आहेत. हा फोन 51 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.
वनप्लस कम्युनिटी सेल दरम्यान वनप्लस 13 स्मार्टफोन 52 हजार 999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल, तर वनप्लस 13s स्मार्टफोन याच सेलमध्ये 49 हजार 999 मध्ये खरेदी करता येईल.
या वनप्लस सेल दरम्यान नॉर्ड-ब्रँडेड स्मार्टफोन्सदेखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. नवीनतम वनप्लस नॉर्ड 6 40 हजार 999 पासून खरेदी करता येईल. वनप्लस नॉर्ड CE6 29 हजार 999 मध्ये, आणि नॉर्ड CE6 लाइट 21 हजार 499 मध्ये खरेदी करता येईल.
स्मार्टफोन व्यतिरिक्त, वनप्लस पॅड 4 हा ३,००० च्या बँक सवलतीसह ५६ हजार ९९९ रूपयांच्या प्रभावी सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. वनप्लस पॅड गो 2 हा 26 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि पॅड लाइट 16 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करता येईल. हा वनप्लस सेल 4 जून ते 10 जून पर्यंत चालेल.