LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 7, 2026

LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..

LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धात अनेक ठिकाणी एलपीजी गॅसच्या प्रकल्पाला टार्गेट करून हल्ले करण्यात आली. ज्याने उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. भारत एलपीजी गॅस भारतात आणण्याकरिता प्रयत्न करत आहे. यादरम्यानच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. मात्र, घरगुती सिलेंडरच्या कितमी सरकारकडून स्थिर ठेवण्यात आल्यात. आता सर्वसामान्य लोकांना मोठा दणका बसला. नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. आता इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा स्वयंपाक घरापर्यंत पोहोचल्या आहेत. घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे घराचे बजेट विस्कळणार आहे.

आजपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये ही दुसरी वाढ आहे. 7 मार्च 2026 रोजी सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 60 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आजच्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 913 रुपयांवरून 942 रुपये झाली आहे.

प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ होत आहे. हॉटेल चालकांनी देखील पदार्थांच्या किमतीत वाढ केली. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही तास असेच सुरू राहिले तर याचे अधिक गंभीर परिणामम भोगावे लागू शकतात. पेट्रोल, डिझेल आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाच घरगुती सिलेंडरच्या किमती वाढणार अशी जोरदार चर्चा सुरू होती.

सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्याकरिता प्रयत्न झाले. मात्र, अखेर आज या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतीय लोकांना बसत आहेत. प्रत्येक गोष्ट महाग होताना दिसत आहे. आता थेट घरगुती गॅस महाग झाला. पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने सरकारने काही गोष्टींचे भाव वाढवले नव्हते. आता एका मागून एक दरवाढ होताना दिसतंय.