काँग्रेसनंच नेताजींची हत्या घडवून आणली, भाजप खासदाराचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 24, 2021

काँग्रेसनंच नेताजींची हत्या घडवून आणली, भाजप खासदाराचा आरोप

https://ift.tt/399NR6y
उन्नाव, उत्तर प्रदेश : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजप खासदार यांनी पुन्हा एकदा वाचाळ बडबड केल्याचं समोर येतंय. यावेळी, नेताजी यांची नेहरु-गांधींशी तुलना करताना 'काँग्रेसनंच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली' असा आरोप साक्षी महाराज यांनी केलाय. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्तानं आयोजित उन्नावमध्ये करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. 'सुभाषचंद्र बोस यांना वेळेपूर्वीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं होतं. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली. त्यांच्या लोकप्रियतेसमोर तर पंडीत नेहरुही कुठेच उभे राहू शकत नव्हते. महात्मा गांधींही काहीच नव्हते' असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलंय. 'स्वातंत्र्य मागितल्यानं देऊन टाकायला इंग्रज एव्हढे सरळ नव्हते. सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा... रक्ताची किंमत चुकवून आपण स्वातंत्र्य खरेदी केलं होतं' असंही साक्षींनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, २३ जानेवारी हा दिवसी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती भारत सरकारकडून '' म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्तानं देशात निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यपाल, मंत्री आणि नेत्यांनी या निमित्तानं नेताजींना आदरांजली वाहिली. साक्षी महाराज यांची याआधीची काही वादग्रस्त वक्तव्यं