नव्या नोटांची हुबेहूब नक्कल! घरातच सापडला छपाईखाना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 28, 2021

नव्या नोटांची हुबेहूब नक्कल! घरातच सापडला छपाईखाना

https://ift.tt/2YjZgdR
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चलनात असलेल्या नवीन नोटा छापणाऱ्या आणि त्या वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणात चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने घरातच सुरू केला होता. पोलिसांनी प्रिंटरसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले आहे. नोटबंदीनंतर चलनात असलेल्या नवीन बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष मस्तूद, महेंद्र दोरकर, आनंद बागडे यांच्यासह इतर पोलिसांची पथके तयार करण्यात आली. याचदरम्यान दोघे बनावट नोटा विकण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे येणार असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला. वर्णनानुसार संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी महेंद्र खंडास्कर आणि अब्दुल खान या दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये दोघांकडे २ लाख ८० हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. हे दोघेही जिल्ह्यातील असून महेंद्र याच्या वाडा येथील घरातून आणखी ३२ लाख ५४ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. चौकशीमध्ये त्यांचे आणखी दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीन शेख आणि फारूक चौधरी या दोघांना अटक करण्यात आली. अमीनकडे १२ हजार, तर फारूककडे ८ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. हुबेहूब छपाई नवीन नोटा चलनात आल्यानंतर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे उघड झाले आहे. मात्र या टोळीने दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा देखील हुबेहूब छापल्या आहेत. खऱ्या नोटा आणि महेंद्र व त्यांच्या साथीदारांनी छापलेल्या बनावट नोटा यामध्ये खऱ्या कोणत्या हे ओळखणे मुश्किल असल्याचे नोटांची छपाई पाहून लक्षात येते. चांगला प्रिंटर आणि त्यासाठी उच्च दर्जाची शाई ही टोळी वापरत होती. नोटांच्या कागदाचाही दर्जा खऱ्या नोटांप्रमाणेच आहे.