व्हिडिओ: सुशांतने त्याचा शेवटचा बर्थडे असा केला होता साजरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

व्हिडिओ: सुशांतने त्याचा शेवटचा बर्थडे असा केला होता साजरा

https://ift.tt/3p4k0Sw
मुंबई- आपल्या प्रियजनांसाठी अनेक सुंदर आठवणी मागे सोडून गेला आहे. त्याच्या याच आठवणी चाहते अजूनही हृदयाशी घट्ट पकडून आहेत. २१ जानेवारी १९८६ रोजी सुशांतचा जन्म पटनामध्ये झाला होता. सहा बहिणींनंतर जन्मलेल्या सुशांतने अल्पावधीत असं काही केलं जे अनेकांना संपूर्ण आयुष्यभर जमत नाही. याचमुळे आज जगभरात त्याचे कोट्यवधींहून जास्त आहेत. आज त्याच्या वाढदिवसाला त्याच्या शेवटच्या वाढदिवसाचा व्हिडिओ चर्चेत आहे. सुशांतने आपला शेवटचा वाढदिवस सिनेसृष्टीतील मित्र- मैत्रिणींसोबत नाही तर कुटुंबासोबत साजरा केला होता. गेल्या वर्षी म्हणजेच २१ जानेवारी २०२० रोजी सुशांतने चंदीगडमध्ये आपल्या बहिणींसोबत शेवटचा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाचा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत वाढदिवसाला आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वाढदिवस साजरा करताना दिसतो. यावेळी त्याने घरी पूजाही केली होती. गेल्या वर्षी कोणालाही कल्पना नसेल ही तो त्याचा शेवटचा वाढदिवस ठरेल. १४ जून २०२० रोजी सुशआंतने त्याच्या राहत्य घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण जग हादरून गेलं होतं. याआधी कधीही एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूवर चाहत्यांकडून सोशल मीडिया अशाप्रकारे न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली नव्हती. याचमुळे सुशांत चाहत्यांसाठी किती खास आहे ते दिसून येतं. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआय अद्याप चौकशी करत आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये होत असलेली घराणेशाहीवर बोलले गेले. सर्वसामान्यांनी मुव्ही माफियांविरुद्धचा त्यांचा राग सोशल मीडियावर बोलून दाखवला. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर, सोबत असलेले त्याचे संबंधही चर्चे राहिले. सुशांतच्या मृत्यूच्या तपासणीमुळे बॉलिवूडमध्ये पसरलेलं ड्रग्जचं जाळंही समोर आलं. याच प्रकरणात रियाला एक महिना तुरुंगवासही भोगावा लागला होता. असं असलं तरी सुशांतच्या मृत्यूच्या तपासात सीबीआय आतापर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.