
नवी दिल्ली: No threat On captaincy एडिलेड ते ब्रिस्बेन या चार कसोटी सामन्यात दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील अनेक गोष्टी बदलल्या. ३६ धावांवर ऑल आउट होणाऱ्या संघाने गाबा किल्ला सर केला. तोही अनुभव नसताना संघर्ष, जिद्द आणि मेहनत करून. भारतीय संघाच्या या विजयाने ड्रेसिंग रुममधील समीकरण बदलले आहे. वाचा- ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या या विजयानंतर अनेकांकडून ()ला कसोटी संघाचा कर्णधार करण्याची मागणी केली जात आहे. पण नजिकच्या भविष्यात ही गोष्टी शक्य नाही. भारतीय संघाच्या कोणत्याही क्रिकेट संघातून (virat kohli )ला कर्णधारपदावरून दुर केले जाणार नाही. वाचा- भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रुमधील काही खेळाडूंचे महत्त्व वाढले आहे. पुढील महिन्यात जेव्हा विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाचे पुन्हा नेतृत्व हाती घेईल. तेव्हा रोहित शर्मा, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या फॅब फोरचे संघातील वजन वाढले असेल आणि त्यांच्या मतांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाईल. कोहली जेव्हा ऑस्ट्रेलियातून भारतात आला होता तेव्हा संघाचा ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. भारतीय संघाची मान खाली होती. पण ब्रिस्बेनमध्ये येईपर्यंत चित्र पूर्ण बदलले. वाचा- विराट कोहली यापुढे कर्णधार म्हणून सर्वात पुढे असला तरी संघाचे सामूहिक नेतृत्वात आता या फॅब फोर शिवाय पुढे जाता येणार नाही. त्यांचे मत विचारात घ्यावेच लागले. ब्रिस्बेनवरील विजयानंतर रहाणेला विचारण्यात आले की कोहली आल्यानंतर पुन्हा उपकर्णधारपद स्विकारताना कसे वाटले. यावर तो म्हणाला, मी या गोष्टींवर विचार करू इच्छित नाही. विजयाचा आनंद घ्यायचा आहे आणि भारतात परतल्यावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा विचार करायचा आहे. वाचा- अजिंक्यला २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्यापेक्षा अधिक धावा करून त्याने भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कमावले आहे. अश्विनने ३ सामन्यात १२ विकेट घेतल्या. स्टीव्ह स्मिथला रोखण्यात त्याची मोठी भूमिका होती. पुजाराने या मालिकेत मोठी खेळी केली नसली तरी तो मैदानावर थांबला म्हणून भारतीय संघ विजय मिळू शकला. रोहित शर्माची उपस्थिती ही संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरली.