आसाममध्ये करोना लसीचे १००० डोस खराब झाल्याची शंका, चौकशीचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

आसाममध्ये करोना लसीचे १००० डोस खराब झाल्याची शंका, चौकशीचे आदेश

https://ift.tt/3o1LJli
गुवाहाटी : आसाम सरकारच्या आरोग्य विभागानं खराब झालेले करोना लसीचे १००० डोस तपासणीसाठी पुन्हा लॅबकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लसीचे डोस ''च्या 'व्हॅक्सिन स्टोअरेज युनिट'मध्ये ठेवण्यात आले होते. हे सगळे डोस थिजलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर लस खराब होऊन बिनकामाची झाल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केलीय. आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदोष तापमान नियंत्रण किंवा साठवणुकीतील चुकीमुळे लस खराब होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सिल्चर मेडिकल कॉलेजला एक नोटीसही धाडण्यात आली आहे. ' ऑफ इंडिया'च्या '' लसीच्या चुकीच्या व्यवस्थापनासाठी सिल्चरला ही नोटीस धाडण्यात आल्याचं समजतंय. संबंधित लसीचे डोस खराब झाले आहेत किंवा नाही, याबद्दल अद्याप पक्की खात्री झालेली नाही. तपासणीसाठी ते लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबद्दल अधिक माहिती देता येईल, असं आरोग्य विभागानं म्हटलंय. १६ जानेवारीपासून कोव्हिड १९ विरुद्ध देशभरात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीय. त्यानंतर, लसीच्या चुकीच्या व्यवस्थापनाबद्दलचं हे पहिलंच प्रकरण उजेडात आलंय. लसीकरणासाठी सध्या सीरम इन्टिट्युटच्या 'कोव्हिशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या लसींचा वापर केला जातोय.