प्रकाशपर्व : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

प्रकाशपर्व : पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली

https://ift.tt/3pdbO28
नवी दिल्ली : शिखांचे दहावे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु गोविंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने यांनी बुधवारी सोशल मीडियावरून व्यक्त केलीय. 'प्रकाशपर्वाच्या पवित्र निमित्तानं मी श्री गुरु गोविंद सिंह यांना नमन करतो. गुरु गोविंद सिंह यांचं आयुष्य न्यायसंगत आणि समावेशक समाज निर्माणासाठी समर्पित होतं. आपल्या तत्वांवर ते अढळ राहिले. त्यांचं साहस आणि बलिदान नेहमीच आमच्या आठवणीत राहील' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. गुरु गोविंद सिंह यांची आपल्यावर विशेष कृपा राहिली कारण त्यांच्या ३५० व्या साजा करण्याची संधी आपल्या कार्यकाळात आपल्याला मिळाली, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. २०१७ साली पाटणा साहेबमध्ये आयोजित करण्यात आलेला सोहळ्याची आठवण करत तिथेही गुरुंना देण्याची संधी आपल्याला मिळाली, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. गुरु गोविंद सिंह यांचा जन्म पाटण्यात आजच्याच दिवशी झाला होता. त्यांची जयंती प्रकाशपर्वाच्या रुपात साजरी केली जाते. शिखांचे दहावे गुरु असणारे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांना 'केश, कडा, कृपाण, कंघा आणि कच्छा' अशा पाच वस्तू अनिवार्य केल्या होत्या. याशिवाय खालसा वेश पूर्ण मानला जात नाही.