टोकियो: जपानची राजधानी टोकियोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या आईचे प्रेत तब्बल दहा वर्ष आपल्या घरातील एका फ्रीजरमध्ये लपवून ठेवले होते. आईच्या मृत्यूची बातमी इतरांना समजली असती तर बेघर होण्याची वेळ आली असती, अशी भीती या महिलेला होती. या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव युमी योशिनो असून ती ४८ वर्षांची आहे. तिने पोलिसांना सांगितले की, १० वर्षांपूर्वी तिने मृतदेह लपवला होता. युमी आणि तिची आई दोघे या घरात राहत होते. आईच्या मृत्यूनंतर आपल्याला घरातून बाहेर काढले जाईल अशी भीती तिला होती. क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचे वय ६० वर्ष होते. त्यांना भाडे तत्वावर घर देण्यात आले होते. वाचा: वाचा: योशिनीने आपल्या आईच्या निधनानंतर घरातील एका जुन्या फ्रीजरमध्ये प्रेत ठेवले. महिलेच्या मृत्यची वेळ आणि कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घराचे भाडे न भरल्यामुळे योशिनोला जानेवारी महिन्यात घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर घराच्या सफाईवेळी फ्रीजरमध्ये मृतदेह आढळून आला.