गेल्या वर्षी याच दिवशी...मयुरी देशमुखनं शेअर केली भावुक पोस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 20, 2021

गेल्या वर्षी याच दिवशी...मयुरी देशमुखनं शेअर केली भावुक पोस्ट

https://ift.tt/2KwfNrL
मुंबई: काही महिन्यांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता यानं केलेल्या आत्महत्येमुळं सर्वांनाच धक्का बसला होता. डिप्रेशनमुळं आशुतोषनं त्याचं आयुष्य संपवलं. त्याच्या अचानक जाण्यानं त्याची पत्नी अभिनेत्री हिला देखील धक्का बसला. आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केल्यानंतर तिनं आशुतोषबद्दल सोशल मीडियावर लिहिणं टाळलं होतं. आता इतक्या दिवसांनतर तिनं पुन्हा एकदा आशुतोषसोबच्या आठणींना उजाळा दिला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरीनं आशुतोषच्या आठणींत ही खास पोस्ट शेअर केली आहे. 'गेल्या वर्षी, हाच दिवस...आमच्या लग्नाचा वाढदिवस. मला आनंद आहे की, अॅनीव्हरसरीला रोमँटिकपेक्षा आपण अॅन्डव्हॅचरस डेटवर गेलो होतो. त्यामुळं आम्ही खूप हसलो होतो. आणि तुझ्यासोबतच्या या हास्य आठवणींत आणखी भर पडली',अशी भावुक पोस्ट मयुरीनं शेअर केली आहे. मयुरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'खुलता खळी खुलेना' मालिकेनंतर तिनं कोणतीही मालिका केली नाही. आता तिनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. मराठी नाही तर हिंदी मालिकेतून मयुरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रोमॅन्टीक ड्रामा असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'इमली' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मयुरी सोबतचअभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.